पैठण, (प्रतिनिधी): येथील गोदावरी मल्टीस्टेट संस्थेमध्ये ठेवलेली दहा लाखाची ठेवी परत देण्यास टाळाटाळ करीत असल्याने ठेवीदारने चक्क संस्थेच्या कार्यालयासमोरच समोर समोरून उपोषण सुरू केले होते. परंतु पोलिसांनी उपोषणकर्त्याला दमदाटी करून उपोषण मागे घेण्यास भाग पाडले.
ज्ञानराधा माहिती स्टेटसह अनेक पतसंस्था डबघाईस आल्या. विघ्नहर्ता मल्टीस्टेट कडुनही ठेवीदारांच्या ठेवी देण्यास टाळाटाळ केली जात आहे. ठेवीदारांचे धाबे दणाणले आहेत. त्यातच गोदावरी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीकडून ठेवीदाराच्या ठेवी देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा प्रकार नुकताच घडला आहे.
रोहिदास नगर येथील रहिवासी गोविंद कारभारी शेळके यांनी आयुष्यभराची कमाई गोदावरी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये गुंतवली आहे. या माध्यमातून दोन पैसे जास्त मिळतील या आशेने त्यांनी ही गुंतवणूक केली होती. परंतु त्यांच्या ठेवीची मुदत संपलेली असतानाही त्यांना त्यांच्या ठेवी परत दिली जात नाही त्यांनी दहा लाख (९२) बेऐनो हजार रुपये रुपयाची मागणी संस्थेकडे केली असता गोदावरी मल्टी स्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या स्टेटच्या व्यवस्थापकाने सदर ठेवी परत देण्यास टाळाटाळ करण्यास सुरुवात केली.
नंतर तर चक्क ठेवी मिळणार नाही तुम्हाला कुठे जायचे ते जा असे सांगितल्याने गोविंद शेळके यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी चक्क गोदावरी मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. ठेवीदार गोविंद शेळके यांनी उपोषणाचे हत्यार उपसताच गोदावरी मल्टी टेस्टचे व्यवस्थापक सुदर्शन निवारे यांनी ठेवीदाराकडे जाऊन आम्ही तुमचे पैसे कपाटात ठेवले नाहीत कर्ज रूपाने मार्केटमध्ये गुंतवणूक केली आहे. जसजशी कर्जाची रक्कम वसुल होईल तस तसे तुमचे पैसे परत केले जाईल असे सांगितले.
परंतु शेळके यांनी संपूर्ण रक्कम एक रकमी पाहिजे या भूमीवर ठाम राहिले. व त्यांनी संस्थेच्या कार्यालयासमोरच उपोषण सुरू केले या दरम्यान व्यवस्थापक सुदर्शन निवारे यांनी गोविंद शेळके यांच्यावर विविध प्रकारे दबाव आणण्याचा प्रकार केला आहे. दरम्यान गोविंद शेळके यांनी सुरू केलेल्या उपोषण स्थळी अनेकांनी भेटी देऊन त्यांना पाठिंबा दिला आहे. दरम्यान गोविंद शेळके यांनी संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन, संचालक मंडळांना आपल्या ठेवी परत देण्यात याव्यात अशी विनंती केली. त्यांनी त्यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले.











